केजः दि.१०(प्रतिनिधी) केज (Kaij) तालुक्यातील मस्साजोग जवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होवून एक जण जागीच ठार झाला असून या अपघातात (Accident) दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकी जळून खाक झाली आहे. बीड (Beed) जिल्ह्यात अपघाताची शृंखला सुरुच असून दोन दिवसात पाच अपघात झाली आहेत.
आज दि.१० रविवारी सांयकाळी ६ च्या सुमारास केज (Kaij) तालुक्यातील मस्साजोग येथे हा अपघात झाला. मारुती कार एमएच २३ वाय ०१२१ व मोटार सायकलची केज-बीड (Beed) रस्त्यावर समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात (Accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुचाकी जळून खाक झाली आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नसून पोलिस तपास सुरु आहे. जिल्ह्यात सध्या दिवंसेदिवस अपघाताची संख्या वाढलेली दिसत असुन तीन दिवसातील हा पाचवा अपघात आहे.