बीडः दि.१८(प्रतिनिधी)- शहरातील एका प्लायवूड दुकानात केमिकल कॕनचा स्फोट (Explosion) होवून एक ठार (Killed) तर दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस (Police) श्वान पथकासह दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.
बीड (Beed) शहरात जिजामाता चौकात असलेल्या चंपावती प्लायवूड दुकानात ही घटना घडली. काम सुरु असताना अचानक झालेल्या या स्फोटाने (Explosion) परिसर हादरुन गेला. या घटनेत अनिरुध्द संजय पांचाळ हा ३० वर्षीय तरुण जागीच ठार (Killed) झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस (Police) श्वान पथकासह दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.