BEED24

बापरे… पहा काय आढळले “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत!

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या कमी व्हावी तसेच लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी योजने’त नवीन कोरोना corona रुग्णांबरोबर तब्बल २३ लाख ७५ हजार मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कर्करुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली.

महाराष्ट्रात कोरोना corona रुग्ण व मृत्यूचे Death प्रमाण देशात सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोना corona आटोक्यात आणण्यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री chief minister उद्धव ठाकरे Udhav Thakre यांनी घेतला. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य सेवक आदी मिळून सुमारे ५९,६७९ पथक यासाठी तयार करण्यात आली. राज्यातील घरोघरी जाऊन कोरोना corona रुग्ण शोधण्याबरोबर आरोग्य जनजागृती करण्यात आली. यातून सुमारे २३ लाख ७५ हजार ३७२ मधुमेही, उच्च रक्तदाब तसेच कर्करुग्णांसह कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेण्यात आला. या रुग्णांना योग्य उपचारासह करोना होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यायची याची माहिती देण्यात आली. यात ८,६९,३७० मधुमेही रुग्ण, उच्च रक्तदाबाचे १३,०८,२२७ रुग्ण तर ७३,०५५ हृदयविकाराचे आणि १७,८४३ कर्करुग्णांना शोधण्यात आले. याशिवाय विविध आजारांचे १,०६,८७७ रुग्णांना शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले. दोन टप्प्यात राबवलेल्या या योजनेच्या सर्वेक्षणात सव्वातीन लाख संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर ५१ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. या योजनेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कॅन्सर व हृदयविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून त्यांच्यावरही उपचार सुरु करणे शक्य झाले. मुख्यमंत्री chief minister   उध्दव ठाकरे Udhav Thakre यांच्या दुरदृष्टीमुळे समाजातील उपचारापासून वंचित असलेल्या या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Exit mobile version