किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर)- धारुरचे (Dharur) सुपुत्र प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. एकनाथ शेळके यांना आज प्रजासत्ताक दिनाचे (Republic day) औचित्य साधून शहरातील काशिनाथ चौक येथील ध्वजारोहन करण्याचा मान मिळाला.
आज प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात साजरा होत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic day) ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त धारुर (Dharur) शहरात विविध संस्थात ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते तर हुतात्मा स्मारक व काशिनाथ चौक येथील ध्वजारोहन प्रतिवर्षी भुमिपुत्र असलेल्या नामांकित व्यक्तीं व भुतपूर्व सैनिकाच्या हस्ते करण्यात आले. यंदा शहरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या हुतात्मा काशिनाथ चौकातील ध्वजारोहन प्रसिध्द नेत्र रोग तज्ञ डॉ. एकनाथ बिरुबा शेळके यांच्या हस्ते तर हुतात्मा स्मारक मधील ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक मनोहर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरातील प्रमुख ध्वजारोहन तहसील कार्यालयात तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्या हस्ते झाले.