BEED24

रविवारी विरोधी पक्षनेते अजित पवार बीड जिल्ह्यात ; या गावात जाणार थेट बांधावर.

बीड दि.30 जुलै – रविवारी विरोधी पक्षनेते अजित पवार बीड जिल्ह्यात दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते अनेक गावात थेट बांधावर जाणार आहेत. बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या समवेत रविवारी (दि. 31 जुलै) सकाळी 8 वाजल्यापासून जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.

रविवारी (दि.31) अजितदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सकाळी 9 वाजता परळी (Parli) येथे प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. असे असताना सत्ता पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्यातरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही, मात्र विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळते आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) वतीने सांगण्यात आले.

असा आहे सुधारित दौरा…
दरम्यान, अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे सकाळी 10.15 वाजता जवळगाव ता. अंबाजोगाई (Ambajogai) येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील, मात्र यानंतरचा 11.45 वाजता माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील बेलूरा व दुपारी 12.45 वाजता वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे पिकनुकसान पाहणी दौरा रद्द करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून ते लातूरहून मुंबईकडे रवाना होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

( Opposition leader Ajit Pawar in Beed district on Sunday; Go directly to the dam in this village. )

Exit mobile version