BEED24

धारुर तालुक्यातील सामान्य शेतकरी पोरं होणार फौजदार; MPSC यशामुळे रुईधारुर गावात आनंदोत्सव.

किल्ले धारूर दि.10 मार्च – धारुर (Dharur) तालुक्यातील रुई धारुर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे त्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या यशामुळे अवघ्या रुईधारुर गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

( Ordinary farmers in Dharur taluka will become faujdars; Happiness in Ruidharur village due to MPSC success )

रुईधारुर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण सतीश शिवाजीराव तिडके याने मंगळवारी जाहिर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. सतीश तिडके याचे पोलीस उपनिरीक्षक पद निश्चित झाले असून या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

रुई येथील शिवाजी तिडके वडिलोपार्जित शेती करणारे अल्पभुधारक शेतकरी आहेत. शेतीवर उदरनिर्वाह चालवत आपल्या मुलांनी शिकावं ते अधिकारी व्हावे असे स्वप्न उराशी बाळगत त्यांचे शिक्षण पूर्ण केले. सतीश तिडके याचे अंबाजोगाई येथे खोलेश्वर विद्यालयात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. यानंतर सतीश यांनी नागपूर येथे बीएससी ॲग्री हे पदवीचे शिक्षण पुर्ण केले.

अधिकारी होण्याचे वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सतीश तिडके याने पदवीच्या शिक्षणानंतर पुणे येथे राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) स्पर्धा परिक्षेची तयारी केली. यासाठी विशेष मार्गदर्शन क्लासेस लावले व स्वतः कठोर मेहनत केली. 2019 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परिक्षेची पीएसआय पदाच्या गुणवत्ता यादी दि.7 रोजी जाहिर झाली असुन यात त्याने स्थान पटकावले.

रुईधारुर गावात व कुटुंबाला सदर वृत्त समजताच गावातील तरूण फौजदार ( पोलीस उपनिरीक्षक ) होणार म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळावी म्हणून बुधवारी (दि.9) गावकऱ्यांच्या वतीने सायंकाळी 7 वाजता अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांच्या हस्ते सतीश व तिडके कुटूंबियांचा सत्कार करण्यात आला.

 

Exit mobile version