BEED24

बीड जिल्ह्यात आजही उद्रेक; बीड 127 तर अंबाजोगाई, परळी, केज, आष्टी, माजलगावात संख्या वाढली.

बीड दि.1 एप्रिल- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा उद्रेक दिसुन येत आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2956 प्राप्त अहवाला पैकी 393 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2563 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सत्ताविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज तब्बल 127 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. धारुर 4 तर केजमध्ये 33 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(Outbreak in Beed district today; Beed 127 while Ambajogai, Parli, Cage, Ashti, Majalgaon increased the number.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-127, अंबाजोगाई-65, आष्टी-45, धारुर-4, गेवराई-11, केज-33, माजलगाव-34, परळी-34, पाटोदा-26, शिरुर-5, वडवणी-9
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.1 गुरुवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 325 वरुन वाढत 393 झाली आहे. बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसुन येते. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज सातवा दिवस आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. 39 हजार पेक्षा जास्त नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण राज्यात आढळून आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यवर लॉकडाऊनचे सावट आहे.

Exit mobile version