BEED24

पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेस जांबाज ट्रेकर्स सज्ज …

माजलगाव दि.8 जुलै – पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेस जांबाज ट्रेकर्स सज्ज झाले आहेत. शिवराष्ट्र हैकर्स कोल्हापूर (Shivrashtra Hackers Kolhapur) आयोजित 9 ,10, 11 जुलै 2022 पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेस बीड जिल्ह्यातून जांबाज ट्रेकर्सचे 100 मावळे सहभागी होऊन शिवविचारांचा जागर करणार आहेत. आज ते कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत.

कोल्हापूरच्या शिवराष्ट्र हैकर्सद्वारे 30 वर्षांपासून पन्हाळा पावनखिंड (Panhala Pavankhind) मोहिम सुरू आहे. पन्हाळा पावनखिंड मोहिमेत शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभुसिंग जाधव यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेण्यासाठी 54 किलोमीटर ऐतिहासिक ट्रेकिंगचा थरारक अनुभव बीड जिल्ह्यातील जांबाज ट्रेकर्सचे 100 मावळे मोहिमविर सहभागी होऊन घेणार आहेत.

शिवराष्ट्र हैकर्सचे सर्वेसर्वा प्रशांतजी साळुंके यांच्या नेत्रत्वात बीड जिल्ह्यातून सदरील मोहिमवीर एवढ्या संख्येने जाण्याची ही पहिलीच वेळ असून ट्रेकिंगकडे (Trekking) वळण्यास तरुण पिढी सरसावली असल्याचे दिसून येत आहे. शंभर तरुण मोहिमेची जोरदार तयारी करत आहेत असे जांबाज ट्रेकर्सचे (Trekkers) संस्थापक विजयसिंह सोळंके व शिवराष्ट्र हैकर्स चे जिल्हा प्रमुख सचिन अंडील यांनी सांगितले.

या मोहिमेत विजयसिंह सोळंके, सचिन अंडील, पुरुषोत्तम जाधव, विठ्ठल दादा लगड, युवराज काका लगड, गोरख धुमाळ, मिथुन जाधव, पांडुरंग दादा लगड, सुनील शिंदे, अविनाश चिद्रवार, धनंजय भावठाणकर, प्रदीप घोलप, निखिल शास्त्री, रमेश मोरे, नारायण झोडगे यांच्या सह 100 मावळे मोहिमेत सहभागी होत आहेत. जांबाज ट्रेकर्सच्या मावळ्यांनी यापुर्वीही विजयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
( Panhala Pavankhind Padabhramanti Mohimes Jambaj Trekkers ready … )

Exit mobile version