मुंबई दि.29 एप्रिल – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता अडचणीत आले आहेत. अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) आरोप करणाऱ्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच ॲट्रोसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांना अटक होण्याची शक्यता असताना सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत राज्य शासनावर गंभीर आरोप केला.
(Former Mumbai Police Commissioner Parambir Singh in trouble; Filed a case after a complaint from the authorities …. Singh again ran to the High Court.)
अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केलेल्या परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावरील भष्टाचाराच्या आरोपांवरुन अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण ३३ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (Police Inspector) अनुप डांगे यांच्यानंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे (Bhimrao Ghadge) यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अखेर अकोला येथे परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या सह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर ॲट्रोसिटी (Atrocity) कायदा (जातीवाचक) भ्रष्टाचार आदी कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान, अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.
पोलीस निरीक्षक (Police Inspector) भीमराव घाडगे (Bhimrao Ghadge) यांनी परमबीर यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. शिवाय काही अधिकारी त्यांना मदत करत होते असही पत्रात म्हटलं होतं. ठाण्याचे आयुक्त असताना परमबीर यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत.
परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे मुलाच्या सिंगापूरमधील व्यवसायात गुंतवले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सिंग यांची उच्च न्यायालयात धाव….
राज्य सरकारने परमबीर सिंग यांची दोन प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकशांच्या विरोधात सिंग यांनी आज दुपारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. 19 एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो.
यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.