BEED24

प्रवाशांकडून पॉकेटमारास चोप; धारुरच्या बस स्थानकात घडली घटना

किल्लेधारूर दि.२१ (वार्ताहर ) धारुर बसस्थानकावर सोमवारी आठवडी बाजारा दिवशी प्रवाशानी दोन पॉकेटमार (Pickpocket) चोरांना रंगेहात पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या (Police) ताब्यात दिले. आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.

धारूर बसस्थानकावर पॉकेटमारी व मोबाईल (Mobile) चोरीमुळे प्रवाशी वैतागून गेले आहेत. शहरात आठवडी बाजारात हि मोबाईल (Mobile) चोरीचे प्रकार वाढले आहेत. सोमवार दि.२१ डिंसेबर रोजी आठवडी बाजाराचे दिवशी दुपारी बारा ते साडे बाराचे दरम्यान एक प्रवाशी गाडीत चढत असताना एका पॉकेटमाराने (Pickpocket) त्यांच्या खिशात पॉकेट मारण्यासाठी हात घातला. यावेळी प्रवाशाच्या सतर्कतेमुळे त्यांला प्रवाशानी तात्काळ पकडले. त्याच्या सोबत त्याचा दुसरा साथीदारालाही ताब्यात घेतले. प्रवाशानी वैतागून त्यांना चांगलाच चोप दिला. प्रवाशी या पॉकेटमाराला चोप देत असताना बसस्थानक ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांनी या पॉकेटचोराना ताब्यात घेतले. चिडलेल्या नागरीकाच्या तावडीतून या पॉकेट चोराना पोलीसांनी पोलीस (Police) स्टेशनला घेऊन पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगीतले. आठवडी बाजारात वाढत्या चोरीच्या घटनामुळे नागरीक हैराण होऊन गेले आहेत. यापुर्वीही अशा स्वरुपाच्या घटना घडल्या असून पॉकेटमार चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

Exit mobile version