किल्लेधारूर दि.28 मार्च – येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काळे यांचे वडिल प्रभाकर लक्ष्मणराव काळे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृध्दापकाळाने राहत्या घरी आज दि.28 रविवारी सकाळी 10 च्या सुमारास निधन झाले.
(Prabhakar Kale passed away in old age.)
प्रभाकर काळे यांनी 34 वर्ष आरोग्य विभागात सेवा केली होती. गेल्या काही वर्षांपासुन प्रकृती अस्वस्थामुळे घरीच होते. आज सकाळी 10 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत (passed away) मावळली. ते दै. सकाळचे प्रतिनिधी प्रकाश काळे यांचे वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पोलिस ठाणे धारुरच्या पाठिमागील वैकुंठधाम स्मशानभुमी येथे दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.