किल्लेधारुर दि.9 नोव्हेंबर – prakash_solanke माजलगाव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची धारुर येथे दि.10 रविवार रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मतदार बंधू व भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके हे उमेदवार आहेत. धारुर तालुक्यातील ग्रामीण भागातील संवाद दौऱ्यानंतर आता धारुर शहरात महायुतीकडून सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांची जाहिर सभा दि.10 रविवार रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस भाजपाचे राज्य कार्यकारीणी सदस्य माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेस महायुतीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू, भगिनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी केले आहे.