BEED24

पदवीधर निवडणूकीसाठी प्रा.ईश्वर मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP तालुकाध्यक्ष प्रा. इश्वर मुंडे Ishwar Munde यांनी औरंगाबाद Aurangabad पदवीधर मतदारसंघ  graduate constituency निवडणूकीसाठी आज दि.११ बुधवार रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीच्या NCP कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रा.मुंडे यांनी याबाबत स्वतः प्रसिध्दी माध्यमासमोर माहिती दिल्याने पक्षाविरोधात बंड करणार की राजकारणाचा भाग आहे याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

मराठवाडा विभाग हा सदैव दुर्लक्षीत राहीलेला विभाग आहे. सततचा कोरडा किंवा ओला दुष्काळ, औद्योगीक क्षेत्रातील मागासलेपण यामुळे या विभागातील जनतेचे आर्थिक मागासलेपण त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. यामध्ये परिवर्तन करुन मराठवाड्यातील युवक व जनतेचे जीवन सुखी करण्यासाठी तसेच मराठवाडयासह महाराष्ट्रात पदवीधर युवकांच्या व शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुधवार दि. ११ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे प्रा. ईश्वर मुंडे Ishwar Munde म्हणाले. प्रा. ईश्वर मुंडे यांनी प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी जिल्हा परिषद बीड अंतर्गत सेवा करून स्वेच्छा निवृत्ती घेवून सामाजीक कार्य चालू केले आहे. ईश्वर शिक्षण संस्था, गांजपूरचे संस्थापक सचिव असून संस्थेअंतर्गत धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात शाळा, कॉलेज व अनाथ विद्यार्थ्यांचे बालगृह चालू आहेत. या मुळे शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले नाव आहे. साने गुरुजी सार्वजनीक वाचनालय, गांजपूरचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने सार्वजनीक वाचनालय क्षेत्रातही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी नुकतीच अंबाजोगाई येथे ईश्वर प्रसाद अर्बन मल्टीपल निधी बँक कार्यरत केली आहे. त्यामुळे अर्थीक क्षेत्रातही चांगली सुरुवात केली आहे. अशा प्रकारे आपला सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आर्थीक क्षेत्रात चांगला संपर्क असून त्याच्या विश्वासावर सदरील निवडणूक लढवणार असून पदवीधर युवक -युवती, शैक्षणिक, ग्रंथालयीन व इतर समस्यांना भविष्यात विधान परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी पदवीधर मतदार आपणास निवडून देवून नक्कीच संधी देतील असा विश्वास त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद Aurangabad यांचे कडे अर्ज सादर केल्यावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.

Exit mobile version