बीड दि.13 मे – Prohibitory orders बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या आदेशावरुन बीड Beed जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस आंदोलनबंदी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी बीड यांनी मनाई आदेश जारी केला आहे. Prohibitory orders issued agian in the Beed district; Collector Deepa Mudhol’s big decision.
जिल्हयात दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिन, पतेती तसेच दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी पारशी नुतन वर्ष प्रारंभ, श्रावण मास आरंभ व अधिक मास समाप्ती होत आहे. जिल्ह्यात राजकीय हालचाली, घडामोडी, मोर्चे, निदर्शने, धरणे, रास्तारोको या सारखी आंदोलन होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ Collector Deepa Mudhol यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंदोलनबंदीचा निर्णय घेतला आहे. दि.4 अॉगस्ट रोजी रात्री 12 वाजेपासून दि. 18 अॉगस्ट 2023 च्या रात्री 24 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश Prohibitory orders जारी करण्यात आले आहेत.
काय आहेत प्रतिबंध Prohibitory orders…
1. या कालावधीत मोर्चे, निदर्शने, धरणे या सारख्या आंदोलनास बंदी.
2. पाच किंवा अधिक लोकांना परवानगी शिवाय एकत्र येण्यास बंदी.
3. शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी इतरांना शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक, लाठ्या काठ्या, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक, दगड किंवा इतरा क्षेपणास्त्र, शरीरास इजा होणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई असेल.
4. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास मनाई.
5. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजवणे किंवा कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचत असेल, व्यक्तीच्या शवांच्या किंवा प्रते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन यासाठी मनाई.