BEED24

पुन्हा धक्का…आजचे सर्व रुग्ण शहरातील… पहा कोणत्या भागातील आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या ॲन्टीजन व स्वॅब नमुन्यात आढळलेली सर्व पॉझिटीव्ह रुग्ण धारुर शहरातील आहेत. ६ ॲन्टीजन (antigen) तपासणीत २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या २४ स्वॅब (Swab) पैकी ९ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही मोठी संख्या आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

काल अचानक धारुर शहरातील कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली होती ती आजही कायम आहे. आज पुन्हा ११ पॉझिटीव्ह आल्याने दोन दिवसात तब्बल २८ रुग्ण वाढले आहेत. कोविड सेंटरमध्ये ३ पैकी १ तर ग्रामीण रुग्णालयात ३ पैकी १ ॲन्टीजन चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत. एकुण ६ ॲन्टीजन चाचण्यात २ पॉझिटीव्ह आढळली. काल पाठवलेल्या २४ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ९ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज १७ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली. दोन दिवसात वाढलेली संख्या शहरवासीयांसाठी चिंतेचा विषय असून नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ६५ वर्षीय पुरुष, उदयनगर, धारुर

२. ३५ वर्षीय पुरुष, तेलगाव रोड, धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

३. २४ वर्षीय पुरुष, साठे नगर, कसबा,धारुर

४. ३५ वर्षीय स्त्री, मठ गल्ली, कसबा,धारुर

५. ६० वर्षीय पुरुष, आशोक नगर,धारुर

६. ३५ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

७. २३ वर्षीय पुरुष, बाराभाई गल्ली, धारुर

८. ७२ वर्षीय स्त्री, पाटील गल्ली, धारुर

९. १७ वर्षीय स्त्री, मठ गल्ली, कसबा, धारुर

१०.४५ वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

११.१३ वर्षीय स्त्री, शिनगारे गल्ली, कसबा, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version