औरंगाबाद दि.24 जून – शिवसंग्रामचे (Shivsangram) संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या उपस्थितीत गुरुवारी दि.24 रोजी पडेगाव येथील ईश्वर हॉस्पिटल सभागृहात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
(Radha at MLA Vinayak Mete’s meeting; Incident at Aurangabad.)
आमदार मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) ठिकठिकाणी संघर्ष मेळावे घेण्याचे जाहीर केले आहे. औरंगाबादेत 26 जुलै रोजी, समता दिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त आज पडेगाव येथील ईश्वर हॉस्पिटलमध्ये शिवसंग्राम (Shivsangram) संघटनेचे पदाधिकारी उमाकांत माकणे यांनी बैठक आयोजित केली होती, या बैठकीला आमदार मेटे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.
या बैठकीत निवडक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यात पडेगाव येथील अशोक आमले, बबनराव मूळे, लतिफ शेख, राहुल यलदि, नंदकुमार म्हस्के, सलीम पटेल, अशोक हांगे, डींगबर मूळे, फूलचंद शिंदे, राम पेहरकर, लक्ष्मण नवले, दिपक ढाकणे आदींची प्रमूख उपस्थिती होती.
या बैठकीची माहिती पडेगाव स्थानिक शिवसैनिक आणि छावा संघटनेचे अशोक वाघ यांना मिळाली. ते सदर बैठकीत मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आले. त्यावेळी मेंटेचे भाषण त्यांनी मध्येच थांबवले. मराठा समाजाची बदनामी खपून घेण्यात येणार नाही, असे सूनावले. संभाजीराजे हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण समाजाची भूमिका मांडावी, असे शिवसेनेचे (Shivsena) पश्चिम उपशहरप्रमूख अंबादास म्हस्के यांनी सांगितले.
त्यावेळी मेटे यांनी त्यांना उद्देशून म्हणाले की ‘आपण शांत बसा व आपले म्हणणे शांतपणे मांडा.’ असे म्हणताच म्हस्के यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची सूरु झाली. यावेळी अशोक आमले यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत झाले. बैठक संपवून बाहेर जातांना पडेगाव – मिटमिटा येथील मराठा बांधवांनी विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्याविराेधात घोषणाबाजी केली.