बीड दि.24 जून – माजलगाव शिवसेनेचे (Shivsena) तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदी निवड झाली. शहरात दाखल होताच त्यांची मिरवणुक काढण्यात आली. या दरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या गटात तुंबळ मारामारी होऊन शहराध्यक्ष पापा सोळंके यांना मारहाण (Freestyle fight) झाल्याची घटना घडली आहे.
(Radha in two groups of Shiv Sena; Freestyle fight in Majalgaon from the post of district president.)
माजलगाव शिवसेनेचे (Shivsena) तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. यांची निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांनी सोशल मीडियावर (social media) याचा थेट विरोध नोंदवत शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदवला होता.
गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकी दरम्यान पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात वंगण घेऊन जाऊन मिरवणूक दरम्यान फेकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पापा सोळंके व त्यांचे साथीदारांना मारहाण केली. यात पापा सोळंके यांना जबर मार लागला आहे. शिवसेनेत उफाळून आलेल्या गटबाजीची जिल्ह्यात चर्चा होत असून वरिष्ठ या प्रकारावर काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.