बीड – Railway महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार 15 ऑगस्ट निमित्ताने बीडच्या दौऱ्यावर आले होते या यावेळी बार्शी नाका रेल्वे स्टेशन कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनात बार्शीनाका इमामपुर रोडवरील रेल्वे स्टेशन थांब्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
बीडचे रेल्वे स्टेशन बार्शीनाका इमामपूर रोड प्रकाश आंबेडकर नगर येथेच मंजूर आहेत असे असतानाही सदर रेल्वे स्टेशन पालवन येथे म्हणजे बीड शहराच्या 7 ते 8 कि.मि. दुर बांधण्यात आले आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होणार आहे. पालवन रेल्वे स्टेशनवरून अहिल्यानगरला (अहमदनगर) जाण्यासाठी पन्नास रुपये लागणार आहेत तर बीड शहरातून पालवण स्टेशनवर जाणेसाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च होणार आहे. म्हणून पालवन रेल्वे स्टेशन नागरिकांना परवडणारे नाही. यामुळे बार्शीनाका इमामपुर रोडवर रेल्वे स्टेशन थांबाचे काम त्वरित सुरू करावे, कारण बार्शी नाक्यावरून शेतकऱ्यांना आणि सर्वच नागरिकांना नवा आणि जुना मोंढा. कृषी उत्पन्न बाजार समिती. एमआयडीसी, आठवडी बाजार, आडत मार्केट, बस स्टॅन्ड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, समाज कल्याण ऑफिस, जिल्हा रुग्णालय, एसपी ऑफिस, जिल्हा न्यायालय, शासकीय दूध डेरी, महिला रोगणालय, जिल्हा क्रीडांगण आणि जवळपास 95 टक्के शाळा महाविद्यालय हे बार्शीनाका इमामपुररोड रेल्वे स्टेशनवरून जवळ आहेत. तसेच चारही दिशेने नॅशनल हायवे असल्यामुळे बार्शी रेल्वे स्टेशन वर ट्राफिक होणार नाही. विशेष म्हणजे बार्शीनाका इमामपुर रेल्वे स्टेशनवर रेल्वे बोर्डाने यापूर्वीच जमीनी खरेदी करून चार मोठ्या बिल्डिंग तयार केलेल्या आहेत. म्हणूनच एकदम कमी खर्चात रेल्वे स्टेशन होईल. म्हणून बार्शी नाका इमामपुर रोडवर रेल्वे स्टेशन (रेल्वे थांबा)चे काम त्वरित सुरू करावे अशी विनंती बार्शी नाका इमामपुर रोड रेल्वे स्टेशन कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित दादां पवार यांनी सदर निवेदन लक्षपूर्वक वाचले आहे, यावेळी संपादक गमंतभाऊ भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बार्शीनाका रेल्वे स्टेशन कृती समितीचे कार्य अध्यक्ष खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वात, गोरख शिंगण,नगरसेवक अमोल पऊड, शेख अखील भाई, शनेश्वर गायकवाड,शेख युनुस भाई, आदी मान्यवर उपस्थित होते,
