मुंबई दि.23 अॉक्टोंबर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
(Raj Thackeray and his mother infected with corona; All Thackeray’s planned events canceled.)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दोघांवरही ठाकरे यांच्या राहत्या घरी उपचार सुरु आहेत.
लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना कोरोनाची लागण
राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असून देखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मनसेचे सर्व मेळावे स्थगित
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.