माजलगाव दि.13 जून – Rape माजलगाव तालुक्यातील एकदरा गावात शेतामध्ये शेळ्या चारणाऱ्या दोन मुलींवर तिघांनी अतिप्रसंग केला असून या घटनेने बीड Beed जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटना शनिवार व रविवार रोजी घडली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात ग्रामीण -पोलिसात Police गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपीना माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. Rape … Shocking … Minor girls who were herding goats were raped in Majalgaon taluka.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की दोन अल्पवयीन मुली माजलगाव Majalgoan तालुक्यातील एकदरा गावच्या शेजारी असणाऱ्या शेतात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारत होत्या. यावेळी तिघे जण मोटरसायकवरुन तेथे आले. यापैकी दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना Minor girls बळजबरीने बाजूच्या उसामध्ये नेऊन अत्याचार Rape केला. त्यानंतर रविवारी देखील एका मुलीवर तिघांपैकी एका आरोपींने धमकावून अत्याचार केला. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीच्या minor girl फिर्यादीवरून विकास बरडे, करण माळी व केशव राऊत या तिघांजनाविरुद्ध माजलगाव Majalgoan ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को pocso अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीनही आरोपींना पोलीसांनी Police ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक API अविनाश राठोड हे करत आहेत.