BEED24

महाराष्ट्र डाक विभागात भरती; दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.

मुंबई दि.29 एप्रिल – राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी (Government job opportunity) मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (Maharashtra Postal Department) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी 2 हजार 428 उमेदवारांची भरती (Recruitment) केली जाणार आहे.

(Recruitment in Maharashtra Postal Department; Government job opportunity for 10th pass.)

या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र डाक विभागातील (Maharashtra Postal Department) या जागांसाठी जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पदे व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

GDS-डाक सेवक.

काय आहे शैक्षणिक पात्रता :
10 वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे.

पदे : 2428 जागा.
काय आहे परीक्षा शुल्क :
General/OBC/EWS: ₹ 100/ – [SC/ST/PWD/महिला: फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 मे 2021.

अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/ वर लिंककरुन मिळवू शकतील.

Exit mobile version