BEED24

curfew… संचारबंदीत शिथिलता … मात्र….

बीड दि.1 नोव्हेंबर – curfew… बीड जिल्ह्यात 30 अॉक्टोंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनात उसळलेल्या उद्रेकानंतर जिल्हाभर दि.31 अॉक्टोंबर रोजी संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी दिले होते. यानंतर दि.31 मंगळवारी दिवसभर शांतता प्रस्थापित झाल्यावर दि.1 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पासून संचारबंदीत शिथिलता देण्यात आली मात्र जमावबंदी कायम असणार आहे. (Relaxation of curfew… but…)

दि.30 मंगळवार रोजी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संतप्त जमावाकडून जाळपोळ व नासधुस करण्यात आली होती. यानंतर रात्री जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश काढले होते. याच वेळी संपूर्ण इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे जिल्हाभर सर्व शासकीय प्रतिष्ठाण, व्यवसाय व वाहतूक ठप्प पडली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात मंगळवारी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दि.31 मंगळवारी रोजी रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी लावण्यात आलेल्या संचारबंदीत शिथिलता दिली आहे. मात्र जमावबंदी आदेश कायम राहिल असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामुळे कुठेही चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमाव करता येणार नाही. दरम्यान जिल्ह्यातील बंद पडलेली इंटरनेट सेवा बहाल करण्याचा निर्णय आज दि.1 बुधवारी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version