BEED24

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुधारित नियमावली जाहिर; पहा काय आहेत राज्यातील नवे नियम.

मुंबई दि.11 अॉगस्ट – राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक (Cabinet meeting) आज दि.11 बुधवारी पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी (Hotelier) दिलासादायक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबाबत माहिती दिली.

(Revised rules announced after state cabinet meeting; See what the new rules in the state are.)

असे आहेत नवीन नियम (guidelines)…
1) 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, मॉल्सही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
2) कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे (Corona vaccine) दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार
3) धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार
4) लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक

5) नियम न पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते
6) उपहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता
7) खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाह सोहळ्यांना 200 व्यक्तींनाच परवानगी आणि हॉलमध्ये असेल तर जी आसन क्षमता असेल त्याच्या 50 टक्के परवानगी किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.

8) 24 तास खासगी कार्यालये सुरू राहू शकतील. एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात 25 टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालये सुरू ठेवता येतील, अशी सूचना देण्यात आलेली आहे.
9) सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
10) सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी

Exit mobile version