किल्लेधारुर दि.3 सप्टेंबर – Road Robbery काही दिवसांपूर्वी दिर भावजईस लुटल्याची घटना ताजी असताना पुन्हा धारुर Dharur तालुक्यात दुचाकीचालकास पोलिस Police असल्याचे भासवून लुटल्याची घटना धुनकवाड फाट्याजवळ घडली. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ( Road Robbery… Bikers robbed in Dharur taluka; He pretended to be the police.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुळचे धारुर Dharur तालुक्यातील चारदरी येथील रहिवासी व सध्या भगवान नगर ता. माजलगाव येथे वास्तव्यास असलेले शिवाजी एकनाथ सोनवळकर हे दि.2 सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी 9 वाजे दरम्यान मोटारसायकलवर तेलगाव मार्ग चारदरीला जात होते. यावेळी धुनकवड पाटीजवळ पाठीमागून युनिकाॅर्न मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सोनवळकर यांची गाडी थांबवत आम्ही पोलीस आहोत, गाडी साईटला घ्या असे म्हणत त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले. त्यांनी गाडी थांबवताच त्या अज्ञात लोकांनी सोनवळकर यांना रोडच्या बाजुला खड्ड्यात नेऊन धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लाॅकेट, अंगटी व रोख रक्कम काढुन घेत मारहाण करून पसार झाले. यानंतर शिवाजी सोनवळकर यांनी धारूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन, फिर्याद दाखल केली. दिवसाढवळ्या लुटण्याचा ही दुसरी घटना घडली असून यामुळे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरी करण्याची ही नवीनच पध्दत चोर वापरत असल्याने रस्त्याने एकट्याने मोटारसायकलवर प्रवास करावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पोलीसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून त्या चोरट्यांना अटक करण्याची मागणी होत आहे.