BEED24

समाधानकारक… कोरोनाचा वेग मंदावला. आजची पॉझिटीव्ह संख्या.

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) आज शहरात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ३ असून काल पाठवलेली ३ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत. तर ५४ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत आज ३ कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली.

५४ ॲन्टीजन (Anigen) चाचणीत आज ३ जन कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. काल येथील कोविड (Covid-19) सेंटर मधून ३ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आली आहेत. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन (Anigen) चाचणीत शहरातील एक तर ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१.२३ वर्षीय पुरुष, कटघरपुरा, धारुर

२. ५५ वर्षीय पुरुष, कासारी बोडखा, ता. धारुर.

३. २५ वर्षीय स्त्री, ढगेवाडी, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version