BEED24

ग्राहक सेवा केंद्र मंजुर झालं म्हणत ७१ हजारांना गंडवले… धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एकावर गुन्हा. धारुर मधील घटना

किल्लेधारूर दि.21 मार्च – एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी (SBI customer care) अर्ज केलेल्या अर्जदाराला तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे असे म्हणत अर्जदाराकडून टप्याटप्याने ७१ हजार रूपये ऑनलाईन घेवून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार धारूर येथे उघडकीस आला असून या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात (Police Station) भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात सोशल माध्यमातून (Social Media) धार्मिक भावना (religious feelings) दुखावल्या प्रकरणी धारुर पोलिसात एका विरुध्द गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली आहे.

(Saying that customer service center has been sanctioned, 71 thousand people were ruined … Crime against one for hurting religious feelings. Incidents in Dharur)

धारूर तालुक्यातील चोरंबा येथील सुनिल चित्रसेन रिड्डे यांनी एसबीआय (SBI customer care) ग्राहक सेवा केंद्रासाठी डिसेंबर २०२० ला अर्ज केला होता. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी तुम्हाला एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी भामट्याने तुम्ही नोंदणीसाठी १५ हजार ६०० रूपये पेटीएम करा असे म्हणल्यानंतर अर्जदाराने ग्राहक सेवा केंद्र आपल्याला मिळणार या हेतूने भामट्याला १५ हजार ६०० रूपये पेटीएम केले.

त्यानंतर दि.२१ जानेवारी ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान त्या भामट्याने अर्जदाराला वेळोवेळी पैशाची मागणी केली. अर्जदाराने भामट्याच्या इंडस्ट्रीयल बँक अकाऊंट नंबर १५९५३६०२७४२२ व कॅनरा बँक अकाऊंट नं.४९५६१०१००५५६६ या अकाऊंटवर ७० हजार ९०० रूपये पाठवले. मात्र त्यानंतर अजून पैशाची मागणी होवू लागली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुनिल रिड्डे यांनी धारूर पोलीस ठाणे (Police Station) गाठून आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. यावरून भामट्याच्या विरूद्ध कलम ४२०, ४६४ भादंवि कलम ६६ (सी) ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एका विरुध्द गुन्हा
धारुर पोलिसात धार्मिक भावना (religious feelings) दुखावल्या प्रकरणी एका विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर येथील सुरेश गवळी याने पवित्र धर्मग्रंथ कुराणमधील आयातीचे चुकीच्या पध्दतीने हिंदी अनुवाद करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल माध्यमातून (Social Media) केली. याप्रकरणी शेख अक्रम यांनी धारुर पोलिसात दि.20 रोजी तक्रार दिली. या तक्रारी वरुन सुरेश गवळी याच्या विरोधात धारुर पोलिसात कलम 255, 505 व 188 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी तपास करुन आरोपीस अटक केली.

Exit mobile version