BEED24

अशीही माणूसकी…. दिवंगत सहकार्यासाठी कशी केली मदत पहा

किल्लेधारूर दि.७ (वार्ताहर) तालूक्यातील कासारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाबाराय रामराव पडलवार यांचा अपघाती मृत्यू झाला. या कुंटूंबाला आधार देण्यासाठी तालूका जुनी पेन्शन Pention हक्क संघटनेने पुढाकार घेतला. या कुंटूंबास आर्थिक मदत करून माणूसकीचे दर्शन घडवत त्यांचे वारसास मदतीचा धनादेश दिला. या उपक्रमाचे सर्वञ कौतूक होत आहे.

तालूक्यातील कासारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाबाराव रामराव पडलवार यांचा दि.१८ नोव्हेंबर २०१९ रोजी अपघाती मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन Pention बंद केली आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चात कुटुंबाला शासना कडून कसलीही मदत मिळणार नाही. कै.बाबाराव पडलवार हे पूर्वी माजलगाव Majalgoan येथे सेवा करून जुलै २०१९ मध्ये धारूर Dharur तालुक्यात प्रशासकीय बदलीने रुजू झाले होते. पण अवघ्या ५ महिन्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले निराधार झाले. त्यामुळे या कुंटूंबाचे मदतीला माणूसकीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा धारूर Dharur यांनी पुढाकर घेतला. तालुक्यातून तसेच तालुक्याबाहेरील शिक्षक बंधू-भगिनीनी माणुसकीचा वसा म्हणून आप आपल्या परीने सढळ हाताने मदत करून तब्बल एक लाख अठ्याअंशी हजार चारशे पंचेवीस १,८८,४२५ ₹ जमा झाले. येथील पंचायत समिती सभागृह धारूर येथे गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, गट शिक्षणाधीकारी गौतम चोपडे यांच्या हस्ते स्व. बाबाराव पडलवार यांची पत्नी आणि दोन मुले यांच्या उपस्थितीत एकूण रकमेचा धनादेश देण्यात आला. संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वञ कौतूक होत आहे. या वेळी सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, साधन व्यक्ती तसेच महाराष्ट्र जुनी पेन्शन Pention हक्क संघटन शाखा धारूर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version