BEED24

पहा कशी साजरी होणार ऐतिहासिक नगरी किल्लेधारूरमध्ये शिवजयंती….

किल्लेधारूर दि.१८(प्रतिनिधी)- शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. १९ शुक्रवार रोजी सकल मराठा समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिरासह (blood donation camp) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज किल्ले धारूर यांनी केले आहे.

किल्ले धारूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा दुध दही यांनी अभिषेक करून सुरवात करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने कोरोना विषयी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. बस स्टँडच्या मागे गजानन शॉपिंग सेंटर येथे रक्तदान शिबिराचे (blood donation camp) आयोजन केले आहे. यानंतर याच ठिकाणी अल्पोपहाराचा कार्यक्रम होणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज किल्लेधारुर च्या वतीने करण्यात आले आहे.

याशिवाय प्रतिवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कसबा विभाग यांच्या वतीने सांयकाळी कोविड नियम पाळत भव्य मिरवणूक काढून शिवजयंती साजरी होईल. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) चौकात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन होईल. यानंतर मिरवणूकीत विविध पारंपारिक खेळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन होईल

पेठ विभागाच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपारिक शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शिवाय शिवजयंती निमित्ताने येथील कायाकल्प फांऊडेशनच्या वतीने ऐतिहासिक किल्ल्यात शिवप्रतिमा पुजन करुन स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

Exit mobile version