BEED24

पहा बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील अंशतः बदल … कोणाला मिळेल सुट.

बीड दि.29 मार्च – बीड जिल्ह्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन (Beed lockdown) पहिल्याच दिवशी विरोधामुळे गाजला होता. थेट यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला तर आ.सुरेश धस यांनी आष्टीत कायदेभंग केला. एआयएमआयएमने थेट लॉकडाऊनला (Beed lockdown) विरोध करत इतर व्यवसायिकांची बाजू लावून धरली होती. यावर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी 29 पर्यंत शिथिलता देण्याचे आश्वासन दिले होते.

(See the partial change in the lockdown in Beed district … who will get the discount.)

आज नवीन आदेशाद्वारे दि.30 मंगळवार पासुन सकाळी 7 ते 9 या वेळेत बदल करुन शिथिल वेळेत 1 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इतर व्यवसायिकांनाही यावेळेत आपले आस्थापना उघडी ठेवता येणार असून हॉटेल, खाणावळ, बार रेस्टॉरंट, पानटपरी व चहा स्टॉलला ग्राहकांना पार्सल देण्यासाठी आस्थापना सुरु ठेवता येणार आहेत. मात्र यासाठी त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच गर्दी होवू नये म्हणून 6 फुटावर मार्कींग आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड लॉकडाऊन मध्ये अंशतः बदल केला आहे.
1.सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी 07.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना 07.00 ते 01.00 या वेळेतच केवळ दुकानातुन घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.

2.हॉटेल, खाणावळ, बार रेस्टॉरंट, पानटपरी व चहा स्टॉलला ग्राहकांना पार्सल सेवेसाठी सुरु राहतील. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. दुकानाबाहेर गर्दी होवू नये म्हणून 6 फुटावर मार्कींग आवश्यक.

3. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. गर्दी होवू नये म्हणून 6 फुटावर मार्कींग आवश्यक.

4. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी 7 ते दुपारी 1 सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

5. जिल्ह्यातील कृषी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सर्व आस्थापना व इतर आस्थापना सकाळी 7 ते 1 सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. गर्दी होवू नये म्हणून 6 फुटावर मार्कींग आवश्यक.

6. शासकीय योजनेचे (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजना) एक मिस्त्री व तीन मजुर यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

Exit mobile version