BEED24

धारुरच्या तरुणाची भारतीय मानक संस्थेत शास्त्रज्ञ म्हणुन निवड

किल्लेधारुर दि.१८(वार्ताहर) येथील रहीवासी दुष्यंत हवेलीकर Havelikar यांची दिल्ली Delhi येथील भारतीय मानक संस्थेत( Bearau of standards ) मध्ये शास्त्रज्ञ scientist ब म्हणुन निवड झाली. त्याच्या यशाबद्दल शहरातील नागरीकांनी अभिनंदन होत आहे.

शहरातील वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ.सत्यप्रेम व डॉ.सुवर्णा हवेलीकर Havelikar यांचे दुष्यंत हवेलीकर हे व्दितीय चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण किल्लेधारुर Dharur येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण सगरोळी जिल्हा नांदेडच्या श्री छत्रपती राजर्षी शाहू सैनिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजनिअरिंग येथुन त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्याने परिक्षेत ६८ वा क्रमांक मिळवला. दुष्यंत यांची दिल्ली Delhi येथील भारतीय मानक संस्थेत (Bearau of standards ) मध्ये शास्त्रज्ञ scientist ब म्हणुन निवड झाली. त्याच्या यशाबद्दल धारुर Dharur डाँक्टर्स असोसिएशन, पत्रकारांकडुन अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version