बीड दि.28 जुलै – स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त नर्सला (Nurse) पोलीसांकडून (Police) हिन वागणूक देत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप, बीडमध्ये (Beed) पीडितेने केला आहे. यामुळे अर्वाच्च भाषा वापरणार्या, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधील दोन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या नसता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या घरासमोर आत्मदहन (Self-immolation) करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
(Self-immolation in front of Guardian Minister Dhananjay Munde’s house ….! Severe warning of the victim.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडितेवर लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं इतर मुलीसोबत लग्न लावले आणि ते प्रकरण तिथेच मिटवले. मात्र त्यानंतरही तो तरुण दारू पिल्यानंतर पीडितेच्या रूमवर येऊन अत्याचार करत असे. याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला. मात्र तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केला.
“सहा वर्ष तुला गोड लागलं” मग आता कशाला आली तक्रार देण्यास असं म्हणत तिला हीन वागणूक देत अर्वाच्च भाषा देखील वापरली. यामुळे पोलीस निरीक्षक (Police inspector) ठोंबरे, पीएसआय (PSI) मीना तुपे आणि कर्मचारी मेखले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. ही मागणी घेऊन पीडित नर्सने, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू केले आहे.
जर मला न्याय नाही मिळाला, तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या घरासमोर आत्मदहन करेल. असा संतप्त आणि टोकाचा इशारा पीडित नर्सने दिला आहे. तर अन्यथा वंचित बहुजन आघाडी हे आमरण उपोषण (Fast unto death) असचं सुरू ठेवेल. असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे.