BEED24

नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ; फरार आरोपींच्या शोधात पोलिस…

( Beed, April 26: A disturbing incident has come to light in Beed district. A 24-year-old married woman from Beed was allegedly raped by a cousin in Ahmednagar in the city of Ahmednagar, while another threatened to make the pornographic videos go viral with the help of the two. Is. Police are searching for the accused in the case. )

बीड दि.26 एप्रिल – बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बीडमधील (Beed) एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन अहमदनगर ( Ahmednagar) शहरात, तर दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल (Pornographic videos go viral) करण्याची धमकी देत, दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. काल जिल्ह्यात अत्यंत गंभीर व नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड (Beed) जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी पिडीतेची रात्रभर छेड काढली.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा (Rape) तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा (Gang Rape) गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे पिडीतेचा जबाब…
याविषयी पीडितेने पोलिसात (Police) दिलेल्या तक्रारीवरून, 24 वर्षीय पीडित विवाहिता ही आपल्या 2 लहान मुलं, नवरा अन सासुसह पुण्यात रहाते. मात्र नवऱ्यासोबत 4 एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्याने, ती माहेरी बीडला आली. मात्र आईने ” तू एकटीच का आली, तू परत तुझ्या नवऱ्याकडे जा” असं सांगितलं. त्यांनतर ती बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. आणि 11 एप्रिलला रोजी पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने (travels) पुण्याला निघाली होती.

( Sensation in Beed district due to disgraceful relationship; Police in search of absconding accused … )

Exit mobile version