BEED24

आ. सोळंकेंच्या लक्षवेधीनंतर बीड पोलिस दलात खळबळ; पोलिस अधिक्षक सक्तीच्या रजेवर… होणार चौकशी.

बीड दि.7 मार्च – आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे गृहविभागाने तात्काळ दखल घेतली. जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवत खातेअंतर्गत चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले.

( Sensation in Beed police force after MLA Solanke’s attention; Superintendent of Police on compulsory leave … There will be an inquiry. )

गेल्या काही दिवसांत बीड (Beed) जिल्ह्यात गोळीबारासह अनेक गंभीर गुन्ह्यांचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी आज विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. यावेळी आ. सोळंके यांनी यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यावर निशाणा साधला.

जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरु असल्याचे सांगत आ.सोळंके यांनी आर. राजा यांच्यावर सर्व पोलिस अधिकाऱ्यांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकाराची चौकशी करुन पोलिस अधिक्षकांच्या बदलीची मागणी त्यांनी केली. याची तात्काळ दखल गृहमंत्री दिलिप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी घेतली.

गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी आ. सोळंके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलिस अधिक्षक (Superintendent of Police) राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवून 15 दिवसांत चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली. आ. सोळंके यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व इतर सदस्यांनी सहभाग घेतला.

 

 

Exit mobile version