गेवराई दि.20 मार्च – गळीतास ऊस गेल्यानंतर फडातील पाचट पेटवून दिलेल्या फडात जळालेल्या अवस्थेत तरुण शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव तहत श्रीराम नगर येथे घडली. दिगांबर विक्रम पांढरे (वय 27) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मयत शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी सदरील प्रकार घातपाताचा असुन, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतला होता.
(Shocking … Burned body found in the middle of a burning sugarcane field; Incidents in Gevrai)
शुक्रवार दि.20 रोजी दिगांबर विक्रम पांढरे (वय 27) गेवराई येथील रोजंदारीचे काम करुन रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आल्यामुळे ते घराबाहेर पडले असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगांबर यांचा मृतदेह (Dead Body) जाधव यांच्या ऊसाच्या फडात (sugarcane field) जळालेल्या आवस्थेत आढळून आला. जाधव यांचा ऊस नुकताच गळीतास गेल्यामुळे त्यांनी ऊसाच्या फडातील पाचट पेटवून दिले होते.
याच ऊसाच्या फडात दिगांबर पांढरे यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead Body) आढळून आला. शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला असता सदर प्रकार घातपाताचा असुन, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा नातेवाईकानी घेतला होता. तलवाडा पोलिस (Police) स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
दरम्यान, पेटवून दिलेल्या ऊसाच्या फडात (sugarcane field) मयत शेतकरी झोपले होते अशी माहिती असून यातच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास जातेगाव तहत श्रीराम नगर वस्ती (ता. गेवराई) येथे घडली. दिगांबर यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. दिगांबर पांढरे यांच्या वडीलाचे निधन झालेले असुन सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. सदरील प्रकार घात की अपघात हे मात्र पोलिस (Police) तपासानंतर उघड होणार आहे.