BEED24

धक्कादायक….धारुर शहरातील कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढली… पहा किती व कोणत्या भागातील आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १० ॲन्टीजन (antigen) तपासणीत २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या ४२ स्वॅब (Swab) पैकी तब्बल १५ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. आजच्या पॉझिटीव्ह रुग्णात शहरातील १४ व ग्रामीण भागातील तिघांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या आज अचानक वाढली आहे. १० ॲन्टीजन चाचण्यात २ पॉझिटीव्ह आढळली तर काल पाठवलेल्या ४२ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी तब्बल १५ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. यामुळे आरोग्य विभागाला धक्का बसला असुन प्रशासन सतर्क झाले आहे. आज २४ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ६५ वर्षीय स्त्री, शिनगारे गल्ली, कसबा, धारुर

२. ५० वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

३. ३० वर्षीय स्त्री, चोरांबा, ता.धारुर

४. १० वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर

५. ४२ वर्षीय स्त्री, चोरांबा, ता.धारुर

६. ३४ वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

७. ३२ वर्षीय स्त्री, आशोक नगर, धारुर

८. १२ वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

९. १२ वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

१०.१० वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

११.२२ वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

१२.२१ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर

१३.२५ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर

१४.६४ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

१५.३३ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

१६.१० वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

१७.२१ वर्षीय पुरुष, बाराभाई गल्ली, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version