पाटोदाः दि.२४(प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही येथे भावकीतील जमीनीच्या वादातून गोळीबार (Firing) झाला असून यामुळे गावात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) नोंद करण्यात आला.
बीड (Beed) जिल्ह्यात कधी काय होईल याचा नेम नाही. अशीच एक घटना काल दि.२३ बुधवार रोजी सायं ४.३० च्या सुमारास घडली. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार (Firing) झाल्याची ही धक्कादायक घटना घडली. यामुळे बसस्थानक परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. गोळीबारामुळे नागरिकांमध्ये काही काळ दहशदीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी तातडीने धाव घेतली. भावकीतील जमीनीच्या वादातून हा गोळीबार (Firing) झाला. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कल्याण सयाजी येवले यांच्या फिर्यादी वरुन भावकीतील सहा व इतर अज्ञात पन्नास जणांविरुध्द गुन्हा (crime) दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक विजय लंगारे यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. पोलीस (Police) पुढील तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.