BEED24

Snake bite सर्पदंशाने सख्ख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारुर दि.24 मे – Snake bite धारूर तालुक्यातील कोयाळ या गावात सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सख्ख्या भाऊ व बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे अख्ख्या कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणा प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. या सापाने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एकाच घरातील दोन निष्पाप जीवांचा गेलेल्या बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version