बीड दि.5 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2959 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 67 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2892 जण निगेटिव्ह आली आहेत.
(So many corona patients found in Beed district on Sunday; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-18, अंबाजोगाई-3, आष्टी-20, धारुर-3, गेवराई-3, केज-13, माजलगाव-1, परळी-3, पाटोदा-1, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची आकडेवारी आटोक्यात आहे. दि.1 सप्टेंबर रोजी 4028 अहवालात 79, दि.2 रोजी 3458 अहवालात 83, दि.3 रोजी 2873 अहवालात 57, दि.4 रोजी 3368 अहवाल 67 कोरोना बाधित आढळून आली आहेत.
दरम्यान, राज्यात आज 4,130 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 88 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 02 टक्के आहे.
राज्यात आज 64 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 025 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 469 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.