बीड दि.25 मे – आष्टीत मुलाने बापावर गोळ्या झाडल्याचे प्रकरण ताजे असतानाच दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या बापाचा कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून (Murder) केला. ही खळबळजनक घटना बीड (Beed) तालुक्यातील पिंपळनेर परिसरात आज मंगळवार दि.25 रोजी रोजी सकाळी घडली. पोलिसांनी (Police) आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.
(Son killed by unborn child; Sensational incident in Beed taluka.)
किसन अंबादास तागड (वय 60 रा.पिंपळनेर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. किसन हे दारू पिऊन सतत घरी वाद घालायचे, शिवीगाळ करायचे. या रागातून मुलगा लहू किसन तागड याने ते शेतात एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने सपासप वार करत त्यांचा खून (Murder) केला. मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस (Police) ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक शरद भुतेकर, फौजदार सानप, सुरवसे, वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात आष्टीत बापावर गोळा झाडल्याची घटना घडली होती. सध्या बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार दिसुन येत आहेत.