BEED24

Sports Officer किल्लेधारूरची प्रियांका बनली क्रीडा अधिकारी

किल्ले धारूर दि.8 जून – Sports Officer येथील पत्रकार सदानंद खिंडरे यांची कन्या प्रियांका हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्रीडा अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत दि.७ जून रोजी जाहिर झालेल्या निकालात यश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रियांका खिंडरे हिचे जनता विद्यालय येथे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण नेवासा येथील त्रिमूर्ती निवासी विद्यालय येथे झाले. त्रिमूर्ती संकुल येथे 11 वी आणि 12 वी शिक्षण घेत असताना धनुर्विद्या खेळाशी ओळख झाली. अभिजीत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य स्पर्धा मध्ये पुणे, अमरावती, कोल्हापूर अशा ठिकाणी सहभाग नोंदवला व शाळेसाठी अनेक पारितोषिक मिळवली. पुढील शिक्षणासाठी पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असताना सिंहगड कॉलेजमध्ये रंजीत चामले यांच्याकडे धनुर्विद्या खेळाचा सराव सुरु ठेवला. सिंहगड कॉलेज तर्फे पंजाब, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू अशा अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. अनेक राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सुवर्ण, रौप्य तसेच कांस्य पदक मिळवली. कॉलेज मधील
अनेक नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कामही करत राहिले. झोनल अमरावती , नॅशनल लेवल 1 आणि लेव्हल 2 कोचिंग प्रशिक्षण चेन्नई मध्ये प्राविण्य मिळवले. यामध्ये स्विझरलँड येथे भारत सरकार तर्फे जाण्यासाठी योग प्राप्त झाला आणि स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड आर्चरी लेवल 1 सर्टिफिकेट कोर्से साठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया मार्फत सहभाग नोंदवून तेथे प्राविण्य मिळवले व देशाचे नाव उज्ज्वल केले. तसेच अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकाना मार्गदर्शन केले. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा दिली आणि घवघवीत यश प्राप्त करून आज किल्ले धारूरची प्रियंका खिंडरे क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्रे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version