BEED24

धारुरला कौतूकास्पद काम करणाऱ्या एपीआय सुरेखा धस यांना राज्य महिला आयोगाचा पुरस्कार.

बीड दि. 8 मार्च – धारुर (Dharur) पोलिस ठाण्याच्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी तथा बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) सुरेखा संजय धस यांना राज्य महिला आयोगाचा ( State Women’s Commission ) आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार देवून आज गौरव करण्यात आला.

( State Women’s Commission Award to API Surekha Dhas. )

8 मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राज्य महिला आयोगाकडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यंदा बीडच्या (Beed) पोलीस अधीक्षक कार्यालयातील एएचटीयूच्या (Anti human trafficking unit) प्रमुख सुरेखा धस यांची आदिशक्ती प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाली.

आज 8 मार्च रोजी मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सुरेखा धस यांनी कोविड काळात धारुर पोलिस ठाण्याचा कार्यभार अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळला.

बीड पोलीस दलाची मान उंचावली
सुरेखा धस यांनी यापूर्वी धारुर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केले आहे. आता एएचटीयूच्या त्या प्रमुख आहेत. अनैतिक मानवी व्यापारातून महिलांना बाहेर काढून त्यांच्याकडून कुकर्म करवून घेणाऱ्यांना त्यांनी वठणीवर आणले आहे. धाडसी महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. या पुरस्काराने जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.

एपीआय (API) सुरेखा धस या पुरस्कार मिळवणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, कविता नेरकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच धारुर येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, सय्यद शाकेर, प्रा. इश्वर मुंडे, विजय शिनगारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Exit mobile version