BEED24

धारुरच्या शिक्षकांचे असे ही दायित्व; कोविड निधीतून ऑक्सिजन काॅन्संट्रेटर.

किल्लेधारूर दि.17मे – तालूक्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोविड (Covid-19) आपत्ती काळात आपण हि सर्व सामन्याचे व प्रशासनाचे मदतीला आले पाहीजे या हेतूने पुढाकार घेऊन स्वंयस्फूर्तीने निधी जमा करून सर्व निधीतून ऑक्सिजन काॅन्संट्रेटर (Oxygen concentrator) ऑक्सीजन निर्माण करणारे यंत्र, मल्टीयुज पल्स प्याड (Multiuse pulse pad) व इतर वस्तू खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेत दायित्व निभावण्याचा कौतूकास्पद निर्णय घेतला.

(Such is the responsibility of Dharur’s teachers; Oxygen concentrator from Covid fund.)

तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या कोरोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत सुविधा मिळाव्यात शासकीय पातळीवर यासाठी खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत. परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो याचा विचार बाळगून सामाजिक कार्य करण्याच्या उदात्त हेतूने मदतीचा हात पुढे करत कोविड निधी (Covid fund) संकलनाचा उपक्रम राबवला.

धारुर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी कोविड केअर सेंटरला (Covid care center) भरीव मदत करून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने निधी जमा करून कोविड केअर सेंटरला (Covid care center) आवश्यक असणारी मदत करण्याचे ठरवले आहे. यासाठी सर्वजण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडील यांच्या मार्गदर्शनाने निधी जमा करत आहेत.

आता पर्यंत तालुक्यातील सर्व शिक्षक यांनी जवळपास चार लाख रुपये एवढा निधी जमा केलेला आहे. सदरील निधी योग्य ठिकाणीच वापर करता यावा या साठी तालुका स्तरावर दि.16 मे रोजी बैठक घेतली. या बैठकीस गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, डाॅ.अमोल दुबे व जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची उपस्थिती होती.

प्रथम बैठकीचे प्रास्ताविक आसेफ शेख यांनी केले. निधी जमा करण्यात धारुर तालुक्यातील सर्व शिक्षकांचे योगदान मोलाचे सहकार्य लाभल्याचे शेख यांनी सांगितले. गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी निधी संकलन टीम चे विशेष कौतुक करत आपले कार्य खुप प्रेरणादायी आहे असे संबोधले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डिकले व डॉ. दुबे यांनी तालुक्यातील कोराना बाधित रुग्णांचा (Corona Positive) मृत्यू दर वाढत चालला आहे आणि त्याचे प्रमुख कारण आहे रुग्णाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सदरील निधीतून ऑक्सिजन काॅन्संट्रेटर (Oxygen concentrator) मशीन द्यावी अशी विनंती केली. सदरील विनंती वर चर्चा होवुन सर्वानुमते जमलेल्या सर्व निधीतून ऑक्सिजन काॅन्संट्रेटर -ऑक्सीजन निर्माण करणारे यंत्र, मल्टीयुज पल्स प्याड (Multiuse pulse pad) इत्यादी आवश्यक साहित्य खरेदी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदरील उपक्रमांस गटविकास अधिकारी कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. बैठकीचे आभार प्रदर्शन विकास अडागळे यांनी केले. सदरील बैठकीस रत्नाकर डोंगरे, अर्जुन मुंडे, डि.बी. कोकणे, आपेट, अनुरथ मुळे, शांतीनाथ मुंडे, व्यंकटेश गडदे आदि शिक्षक कोविड (Covid-19) संदर्भात नियमांची काळजी घेत उपस्थित होते. शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Exit mobile version