BEED24

“सनि” पाजींना कोरोनाची लागण

शिमला: दि.२- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता  (Acter)आणि गुरदासपूरचे भाजप (BJP) खासदार सनी देओल (Sunny Deol) (६४) यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी (Amitabh Awasthi) यांनी मंगळवारी रात्री उशीरा माध्यमांना ही माहिती दिली.

बॉलिवूड (Bollywood) चे प्रसिध्द अभिनेता (Acter) सनी देओल मागील काही दिवसांपासून कुल्लू जिल्ह्यात राहात आहेत. कुल्लू जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबईला (Mumbai) जाण्याच्या तयारीत असताना मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी (Amitabh Awasthi) यांनी दिली. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांची नुकतीच मुंबईमध्ये (Mumbai) खांद्याची सर्जरी झाली होती.

 

Exit mobile version