चंदीगढ दि.५- कोरोना (Corona) लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे (Hariyana) आरोग्य तथा गृहमंत्री (Home Minister) अनिल विज (Anil Vij) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. अनिल विज (Anil Vij) हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या ‘कोव्हॅक्सीन’ (Covaxin) च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्यानंतर, आता भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
यासंदर्भात भारत बायोटेकने (Bharat Biotech) एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या (Covaxin) 2 ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस 28 दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस 14 दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) (Covaxin) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, हरियाणाचे (Hariyana) आरोग्य तथा गृहमंत्री (Home Minister) स्वतः विज यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. “मी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. अंबालाच्या (Ambala) सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करून घ्यावी,” असे विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.