BEED24

धारुरात कापूस जिनिंगमध्ये भयंकर आग….

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) येथील अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या आवरगाव शिवारातील बालाजी जिनिंगमध्ये कापसाला काही वेळापुर्वी भयंकर आग (Fire) लागली आहे. सध्या शासकीय कापुस (Cotton) खरेदी सुरु असून या आगीत मोठ्या प्रमाणावर कापुस (Cotton) जळून भस्म झाल्याचा अंदाज आहे. आगीचे  भयंकर रुप आकाशात उडालेल्या धुराच्या लोटाने लांबुन दिसत आहे. सध्या धारुर नगर परिषद, लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना व केज नगर परिषद येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असुन आग (Fire) आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.

Exit mobile version