BEED24

१०२ वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोना वर मात

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) येथील कोविड सेंटरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तालुक्यातील १०२ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोना वर मात केली असुन त्यांची सुट्टी करण्यात आली आहे.

तालुक्यातील अंजनडोह येथील तारामती कांबळे या १०२ वर्षाच्या आजी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्या. त्यांना धारुर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. अगदी ठणठणीत असलेल्या आजीबाईंनी विलगीकरण कक्षात राहुन कोरोना वर मात केली. येथील सर्व कर्मचाऱ्यांनी आजीबाईस निरोप दिला. कोविड केअर सेंटरमधील शंभरी पार केलेल्या त्या पहिल्या रुग्ण ठरल्या. त्यांना कोविड सेंटरमधून निरोप देताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, डॉ. तफील तांबोळी, डॉ. मयुर सावंत, डॉ. मुंडे, डॉ. नेहरकर सह कोविड सेंटरचे सर्व कर्मचारी व नितिन कांबळे उपस्थित होते.

Exit mobile version