चंद्रपूर: दि.३०- आनंदवन (Anandvan) येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे (Dr. Shital Amte) यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. विषारी इंजेक्शन टोचून किंवा विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती येत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.
डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी (Dr. Shital Amte) यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात आनंदवनातील (Anandvan) कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. आठवडाभरातच डॉ. शितल यांनी केलेली आत्महत्येमुळे चर्चेला उधाण येत आहे.