पाथरी दि.23 अॉगस्ट – गोदावरी नदीच्या पात्रातील नाथरा बंधाऱ्याच्या जवळ मंजरथ शिवारात 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीचे प्रेत (Dead body) दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी आढळून आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलीसांनी (Police) केला असून पुढील तपास सुरु आहे.
(The corpse of a stranger found in the character of Godavari; Incident in Manjarath Shivara.)
पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील पोलीस पाटील अतकरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात (Police Station) दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी सदरील माहिती दिली. मंजरथ शिवारात गोदावरी (Godavari) नदीच्या पात्रात नाथरा बंधाऱ्याच्या खाली अनोळखी व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती दिल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक (Police Inspector) डी. जे. मुळे पोलीस जमादार करे, पोलीस नायक एम. ए. मुजमुले हे घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पाण्यात तरंगत असलेले अंदाजे 50 वर्ष वय असलेली मृत व्यक्ती आढळून आली. सायंकाळी 4 च्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने पात्रातील प्रेत बाहेर काढण्यात आले, मयतास पांढरी दाढी आणि केस आहेत तर अंगावर गुलाबी शर्ट आणि निळ्या रंगाची पँन्ट घातलेली आहे. मयताचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस नायक मुजमुले यांनी दिलेल्या माहिती वरून आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.