BEED24

माय लेकराच्या अपघाती निधनाने जिल्हा हळहळला ; दोन कारची समोरासमोर धडक.

बीड दि.30 अॉगस्ट – माय लेकराच्या अपघाती निधनाने आज बीड जिल्हा हळहळला. बीड (Beed) जिल्ह्यातील अपघाताचं (Road accident) सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आज एका भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचारी व तिचा 9 वर्षांचा चिमुरडा अपघाताचा बळी ठरला आहे. दोन भरधाव कार सिरसाळा ता. परळी येथे एकमेकांसमोर धडकल्या आणि हा भीषण अपघात झाला.
( The district was shocked by the accidental death of my daughter; Two cars collide head-on. )

बीडच्या परळी (Parali) तालुक्यातील सिरसाळा येथे झालेल्या या अपघातातने एकच खळबळ उडाली. यातील महिला पोलिस (Lady Police) कर्मचारी ही आपल्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. या दोन्ही कार रस्त्याच्या एका खड्ड्यामध्ये एकमेकांवर पडलेल्या स्थितीत आढळून आल्या आहेत. अपघातातील मृत महिला पोलीस कर्मचारी ही माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलिस ठाण्यात कार्यरत होती.

मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव कोमल शिंदे आहे. त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायला निघाल्या होत्या. त्या दरम्यानच काळाने या दोघांवरही घाला घातला. दरम्यान, दुसऱ्या कारमध्ये असलेल्या परळी रुग्णालयातील डॉक्टर इलियास हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह इतर दोघे जण कारच्या भीषण अपघातामध्ये जखमी झाले. या जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. अपघातात कोमल शिंदे (वय 30), महिला पोलीस कर्मचारी व त्यांच्या 9 वर्षांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेल्या नवनाथ लटपटे, पोलीस कर्मचारी व परळीचे डॉ.इलियास गंभीर जखमी आहेत.

अॉगस्ट महिना तसा बीड जिल्ह्यासाठी अपघाताची शृंखला घेवून आला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघातांचं भीषण वास्तव वारंवार अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे. मेटे यांच्या अपघातादिवशीच पाटोदा तालुक्यात सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर काल वडवणीजवळ दोघे अपघातात दगावले. रस्ते अपघातातील बळींचा आकडा कमी होण्याऐवजी सारखा वाढतोच आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. शिंदे कुटुंबीयांवर या अपघाताने मोठा आघात झाला आहे.

Exit mobile version