BEED24

धारुर तहसील कार्यालयात आणलेल्या त्या मयतावर बारा तासानंतर झाला अंत्यविधी.

किल्लेधारूर दि.8 फेब्रुवारी – धारुर शहरातील तहसील कार्यालयाच्या दारात आज (मंगळवार दि.8) रोजी सकाळी एका महिलेचे प्रेत आणून प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आल्याची घटना घडली. दिवसभर प्रेत तहसील कार्यालयातच ठेवण्यात आले होते. सांयकाळी सहाच्या सुमारास प्रशासनाने जागेवरील ऊसतोडून जागा मोकळी करुन दिल्यावर तब्बल 12 तासानंतर अंत्यविधी करण्यात आला.

(The funeral was held at the Dharur tehsil office twelve hours later.)

धारुर (Dharur) तालुक्यातील गावदंरा येथे दलीत समाजाच्या वहीवाटी प्रमाणे असणाऱ्या स्मशानभुमीवर व रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सोमवारी गावात एका वृध्द महिलेचे निधन झाले असून अंत्यविधीसाठी नेत असताना अतिक्रमणधारकाने यास विरोध दर्शवला. यानंतर हा वाद थेट प्रशासनापर्यंत पोहोचला.

वृध्द मयत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधीत महिलेचे प्रेतच धारुर येथील तहसील (tehsil office) कार्यालया समोर आज सकाळीच आणूण ठेवले. संबंधीत स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय हा अंत्यविधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. सदर प्रकाराची माहिती कळताच तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी गांवदरा येथे जावून घटनास्थळाची पाहणी केली.

तालूक्यातील गावदंरा येथे मांतग, महार, चांभार समाजाची वहीवाटी प्रमाणे गावाचे उत्तरेला स्मशानभुमी आहे. हि स्मशानभुमी अनेक वर्षा पासून असताना शेजारील शेतकऱ्यांने जाणारे येणारे रस्त्यावर व स्मशानभुमी वर अतिक्रमण केल्याने यापुर्वीही अंत्यसंस्कार (Funeral) करताना अडथळा आणला होता.

सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दलीत समाजातील वृध्द महिला सरूबाई मारूती सौंदरमल (वय 90) यांचे निधन झाले. अंत्यविधीसाठी हे घेऊन जात असताना दहा वर्षा पासून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांने त्यांना जाताना अडवले. यामुळे या नातेवाईकानी अंत्यसंस्कार न करता मंगळवारी सकाळी हे प्रेत नातेवाईकानी तहसील समोर आणूण ठेवले होते.

स्मशानभुमीवरचे व रस्त्यावरील अतिक्रमण काढल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. तहसीलदार व्हि.एस. शिडोळकर यांनी या नातेवाईकाना समजवण्याचा व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रश्न मार्गी लावल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्यावर नातेवाईक ठाम होते. तहसीलदार (Tehsildar) गावदंरा येथे घटनास्थळाकडे गेल्या होत्या. यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने येथे पोलीस (Police) बंदोबंस्त कडक ठेवण्यात आला होता.

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर स्मशानात झाले अंत्यसंस्कार.
दरम्यान, नातेवाईकांनी घेतलेल्या भुमिकेनंतर तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी पोलिस, ग्रामसेवक व भुमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीने गांवदरा येथील घटनास्थळी भेट दिली. यावेळी रेकॉर्ड प्रमाणे जागा मोजून अतिक्रमण करुन केलेली ऊस लागवड हटवण्यात आली. यानंतर सांयकाळी साडे सहाच्या सुमारास जवळजवळ बारा तासानंतर मोकळा श्वास घेतलेल्या स्मशानभुमीत मयतावर अंत्यविधी करण्यात आला.

 

Exit mobile version